new-img

विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी राज्य शासनाची मान्यता!

विदर्भातील नागपूर, काटोल व कळमेश्वर (जि. नागपूर) व मोर्शी (जि. अमरावती) व संग्रामपूर (जि. बुलढाणा) इथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी व त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने अध्यादेश काढून मान्यता दिली आहे. यामुळे संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळणार असून संत्रा उत्पादकांना चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता झाली आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याच्या सन 2023-24 करिता सादर केलेल्या अर्थसंकल्पात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील व यासाठी 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार अनुसरुन नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी, व संग्रामपूर इथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणे या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.