new-img

खुशखबर! कांदा अनुदानाचा नवीन जीआर आला, वाचा अधिक

कांदा अनुदानाबाबत नवीन जीआर समोर आला आहे. 8 फेब्रुवारी 2024 ला हा नवीन जीआर आला आहे. कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाचा पैसा उपलब्ध करून दिला जातो. अनुदानाचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. या अनुदानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात दहा हजार रुपये आणि नंतर टप्पे चार हजार रुपये म्हणजेच आतापर्यंत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 24 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळालेली आहे.

काही शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ग्राह्य धरलेल्या काळात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केलेली होती. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची संपूर्ण रक्कम मिळालेली नाहीये. दरम्यान, याच शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाच्या उर्वरित रकमेबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनातं कांदा अनुदान वितरित करण्यासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून देण्यात आली होती.

दरम्यान 8 फेब्रुवारीला शासन निर्णय काढून यापैकी 211 कोटी 66 लाख रुपयांचा निधी संबंधित शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता या निधीतून वीस हजार रुपये प्रति शेतकरी एवढा अनुदानाचा पैसा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.