new-img

दुग्धोत्पादन सहकारी संस्था आणि दूध उत्पादकांसाठी गुड न्यूज!

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नवी दिल्ली येथे पुनर्संरेखित पशुपालन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) योजनेचा शुभारंभ केला आणि एएचआयडीएफ योजनेवरील रेडिओ जिंगलचे देखील प्रकाशन केले.

'ही योजना पुनर्संरेखित करण्यात आली असून ती आणखी 3 वर्षांसाठी लागू केली जाईल. उद्योग, एफपीओ, दुग्धोत्पादन सहकारी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा,' असे आवाहन परशोत्तम रुपाला यांनी केले आहे.

दुग्धोत्पादन सहकारी संस्थांना एएचआयडीएफ च्या कर्ज हमी निधी अंतर्गत कर्ज हमीसाठी सहाय्य मिळेल. ही योजना दुग्धोत्पादन सहकारी संस्थांना अद्ययावत प्रक्रिया तंत्रज्ञानासह त्यांच्या प्रक्रिया पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करायला उपयोगी ठरेल. देशातील अनेक दूध उत्पादकांनाही याचा फायदा होईल. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी डीएएचडी ने अर्ज आणि विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी www.ahidf.udyamimitra.in हे पोर्टल विकसित केले आहे.