new-img

कापूस-सोयाबीन उत्पादकांना मिळणार ४ हजार कोटींची मदत

कापूस-सोयाबीन उत्पादकांना मिळणार ४ हजार कोटींची मदत

राज्य सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. कापूस आणि सोयाबीनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

राज्यात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. यंदा दुष्काळ आणि गारपिटीचा फटक्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना खर्च ही निघत नसल्याने मदत मिळावी अशी मागणी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी करत होते. या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. १६ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीनसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतलाय.