सोलापूर बाजारसमितीत तुरीला १०,००० पर्यंत भाव
- By - Team Agricola
- Mar 20,2024
सोलापूर बाजारसमितीत तुरीला १०,००० पर्यंत भाव
सध्या देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीच्या गुणवत्तेनुसार तुरीला भाव मिळत आहे. चांगल्या गुणवत्तेनुसार तुरीला भाव मिळत आहे. तर २० मार्च आज रोजी सोलापूर बाजारसमितीत पांढऱ्या आणि लाल तुरीची आवक झाली होती. सोलापूर बाजारसमितीत तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे. तर जवळपास तुरीला १०,००० हजाार रूपये दर मिळाला आहे.
लाल तुरीला सर्वसाधारण दर ९,००० ते पांढऱ्या तुरीला १०,००० पर्यंत दर मिळाला आहे. तुरीची आवक घटली आहे .सोलापूर बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात पांढरी २० क्विंटल तुर विक्रिसाठी आली होती. आवक घटल्यामुळे तुरीचे दर वाढले आहे.सर्व बाजारसमित्यांमध्ये क्विंटलमागे तुरीला जवळपास सरासरी दर हा ८,००० ते १०,००० रूपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी अद्यापही तुर भाव वाढीच्या आशेने विकली नाही. येणाऱ्या एप्रिल मे मध्ये तुरीचे भाव अजुन वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.