गहू, हरभरा आवक वाढली
- By - Team Agricola
- Mar 22,2024
गहू, हरभरा आवक वाढली
सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये नव्या हंगामातील गहू, हरभऱ्याची आवक वाढली आहे. गव्हाला सरासरी २००० ते ३००० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यासोबतच हरभऱ्याला ५००० ते ५५०० हजारांचा भाव मिळत आहे.
मागील काही दिवसांपासुन बाजारात नवा गहू आणि हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. शेतकरी विविध बाजारसमित्यांमध्ये आपला गहू, हरभरा विक्रिसाठी आणत आहे. हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील हरभऱ्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हरभऱ्याला त्याच्या व्हरायटी प्रमाणे दर मिळत आहे. हरभऱ्याला ५००० ते ५५०० हजारांचा भाव मिळत आहे. अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे हा दर आणखी काही काळ असाच टिकून राहील.त्यानंतर येत्या काळात हरभऱ्याच्या दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तर एकीकडे नव्या हंगामातील गव्हाची देखील आवक वाढली आहे. मागील काही दिवसांपासून नवा गहू बाजारात येत आहे. तर आता गव्हाला सरासरी ३००० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा गव्हाचे उत्पादन कमी राहणार अशी शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे.