new-img

बाजारसमितींमध्ये आज कांद्याला किती मिळाला दर?

बाजारसमितींमध्ये आज कांद्याला किती मिळाला दर?

कांदा दरात होणाऱ्या सतत घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.  पुणे बाजारसमितीत आज लोकल कांद्याला सरासरी दर  ११०० रूपये मिळत आहे. २८ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीत  १६२५५  क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे. तर या कांद्याला सरासरी १,१०० रुपये भाव मिळाला. सर्वात कमी भाव हा  ४०० रूपये मिळाला असुन जास्तीत दर हा १८०० रूपये मिळाला.


पुणे -पिंपरी बाजारसमितीत आज लोकल कांद्याची ९ क्विंटल आवक झाली. कांद्याला सरासरी दर हा १२०० रूपये मिळाला. वाई बाजारसमितीत लोकल कांद्याची १५ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर हा ११०० रूपये मिळाला. तर या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ६०० तर जास्तीत दर १५०० रूपये मिळाला. कांद्याच्या दरात दरात चढ-उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.