new-img

हळदीला मिळतोय १७,५०० रूपये भाव

हळदीला मिळतोय १७,५०० रूपये भाव 

यंदाच्या हंगामात हळदीला चांगला दर मिळत आहे. तर सध्या हळदीला सरासरी १७५०० रूपये भाव  मिळत आहे. हळद खरेदीच्या नव्या हंगामाला मागील दोन आठवड्यापासुन सुरुवात झालीआहे.

 कृषी उत्पन्न बाजारसमिती मुंबई येथे आज २८ मार्च रोजी सरासरी १७५०० रूपये भाव मिळाला. कमीत कमी दर हा १५००० ते जास्तीत दर हा २०००० रूपये मिळाला असुन ५१ क्विंटल हळदीची आवक झाली. बुधवारी याच बाजारसमितीत ३८१ क्विंटल हळदीची आवक झाली आहे. हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.