new-img

सोयाबीन विकावी का ठेवावी? उत्पादक शेतकरी अडचणीत

सोयाबीन विकावी का ठेवावी? उत्पादक शेतकरी अडचणीत

सोयाबीन च्या भावात सतत चढउतार सुरू आहे. त्यामुळे सोयाबीन विकावी का ठेवावी असा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडत आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. सोयाबीनला सरासरी दर हा ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रूपयांदरम्यान दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.


यंदा शेतकऱ्यांना सोयाबीनला ६००० रूपये भाव मिळावा अशी आशा होती. मात्र सोयाबीनचे भाव अजुनही ५००० हजारांच्या खालीच आहे.  गेल्या दोन वर्षांपासुन सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. 


महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ९ एप्रिल रोजी सोयाबीनला राहोरी-आंबोरी बाजारसमितीत सरासरी दर हा ४३०० रूपये मिळाला आहे. त्यानंतर लासलगाव-विंचुर बाजारसमितीत सरासरी दर हा ४४०० रूपये मिळाला आहे. सोयाबीनच्या बाजारात चढ उतार सुरुच राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.