तुरीची आवक घटली, दरात वाढ
- By - Team Bantosh
- Apr 11,2024
तुरीची आवक घटली, दरात वाढ
सध्या सोयाबीन आणि कांद्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. त्यातच आता तुरीला चांगला दर मिळत असल्याने तुर उत्पादक शेतकरी समाधानी झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा १० हजारांच्या दरम्यान आला. तर काही बाजारसमितीत तुरीचे दर हे १० हजारांचा देखील टप्पा पार केला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडाळाच्या अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल रोजी गज्जर तुरीला सरासरी १२ हजार रूपयांचा दर मिळाला आहे. या बाजारसमितीत ३०० क्विंंटल तुरीची आवक झाली असुन या तुरीला कमीतकमी दर हा ११६०० ते जास्तीत जास्त दर हा १२४०० रूपये मिळाला आहे. जवळपास तुरीला सरासरी १० हजारांचा दर इतर बाजारसमितीत मिळत आहे.
सध्या बाजारसमितीत तुरीची आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे तुरीची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे तुरीला दिलासादायक दर मिळत आहे. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.