new-img

उन्हाळा कांद्याला आज किती मिळतोय दर?

उन्हाळा कांद्याला आज किती मिळतोय दर? 


गेल्या अनेक दिवासांपासुन कांदा दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. बाजारमितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याला कमी दर मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या माहितीनुसार उन्हाळ कांद्याला बुधवारी सरासरी भाव हा १२०० ते १४०० रूपयांपर्यंत मिळाला आहे.
आज ११ एप्रिल रोजी पुणे बाजारसमिती कांद्याची आवक ही ९८२५ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा ११०० रूपये मिळाला आहे. कमीत कमी दर हा या बाजारसमितीत ६०० ते जास्तीत दर हा १६०० रूपयांपर्यत मिळाला आहे. पुणे- पिंपरी बाजारसमितीत कांद्याला सरसरी दर हा १५०० रूपये मिळाला आहे.
कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे आणि काही बाजारसमिती बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी  नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.