हरभरा दरात सुधारणा, जाणून घ्या आजचे दर सविस्तर दर
- By - Team Agricola
- Apr 12,2024
हरभरा दरात सुधारणा, जाणून घ्या आजचे दर सविस्तर दर
मागील काही दिवसांपासुन हरभरा दरात सुधारणा झाली आहे. सध्या बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला सरासरी दर हा ५४०० ते ५८०० रूपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. बाजारातील हरभऱ्याची आवक कमी झाल्याने दरात सुधारणा आली आहे.
हरभऱ्याच्या गुणवत्तेनुसार आणि व्हरायटीप्रमाणे हरभऱ्याला दर मिळत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १२ एप्रिल रोजी मोहोळ बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ५५०० रूपये दर मिळाला आहे. गरडा हरभऱ्याची आवक ही १२ क्विंटल झाली असुन कमीत कमी जास्तीत जास्त दर हा ५५०० रूपये मिळाला आहे. बाजारसमितींमध्ये लाल हरभऱ्याला देखील ५६०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
हरभऱ्याच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. अभ्यासकांच्या अंदाजाप्रमाणे दर हा अजुन ३०० ते ४०० रूपयांनी सुधारण्याची शक्यता आहे.