मक्याला काय मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Apr 13,2024
मक्याला काय मिळतोय बाजारभाव?
आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या भावात घसरण झाली आहे. परंतु देशात मक्याचे भाव हे टिकुन आहेत. सध्या मक्याला सरासरी दर हा २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडाळाच्या अधिकृत माहितीनुसार मक्याला १२ एप्रिल रोजी सरासरी भाव हा २ हजार ३०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. लासलगाव-विंचुर बाजारसमितीत सरासरी दर हा २१०० रूपये मिळाला. तर कमीतकमी दर हा १ हजार ७८० ते जास्तीत दर हा २१४१ रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ४५५१ क्विंटल मक्याची आवक झाली आहे. नागपुर बाजारसमितीत मक्याला २१५० रूपये दर सरासरी मिळाला असुन सर्वात कमी ३ क्विंटल मक्याची आवक झाली आहे.
देशात मक्याचा चांगला उठाव आहे. मका बाजारातील अभ्यासकांच्या मते मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते,