new-img

राज्यात कांद्याची सर्वाधिक आवक, बाजारसमितीत किती मिळतोय दर?

राज्यात कांद्याची सर्वाधिक आवक, बाजारसमितीत किती मिळतोय दर? 

बाजारसमितींमध्ये गेल्या काही दिवसांपासुन उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढल्याने दरात मात्र सारखी घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. 

कांद्याच्या दरात सतत चढउतार होत आहे. आज १७ एप्रिल रोजी कांद्याला सरासरी दर हा पुणे-पिंपरी बाजारसमितीत १४५० रूपये दर मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याचे दर हे कमीतकमी १३०० ते जास्तीत जास्त १६०० रूपये मिळाले असुन कांद्याची आवक ही १४ क्विंटल झाली आहे. 

१६ एप्रिल रोजी सर्वाधिक आवक ही सोलापुर बाजारसमितीत झाली आहे. सोलापुर बाजारसमितीत कांद्याची आवक ही २५२६७ क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर हा ११०० रूपये दर मिळाला आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.