हळदीच्या दरात काहीशी घसरण
- By - Team Agricola
- Apr 26,2024
हळदीच्या दरात काहीशी घसरण
हळदीच्या दरात चांगली सुधारणा झाली होती. यंदा हळदीला चांगला दर मिळत होता. गेल्या काही दिवसांपासुन हळदीचे बाजारभावात पुन्हा काहीशी नरमाई आली आहे. सध्या बाजारसमितींमध्ये हळदीला सरासरी दर हा १४ हजार ते १६ हजार ५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. बाजारसमितींमध्ये राजापुरी हळदीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.
आज २६ एप्रिल रोजी हळदीला सरासरी दर हा सांगली बाजारसमितीत १८ हजार रुपये मिळाला असुन या बाजारसमितीत हळदीची आवक ही ५१२४ क्विंटल झाली आहे. हळदीला सांगली बाजारसमितीत कमीतकमी दर हा १४,५०० रूपये मिळाला जास्तीत जास्त दर हा २१ हजार ६०० रूपये मिळाला आहे. मुंबई बाजारसमितीत हळदीला सरासरी दर हा १९ हजार रुपये मिळाला आहे.
यावर्षी हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. जवळपास ३० टक्क्यांपर्यंत घट आली. बाजारात हळदीची आवक कमी झाली असुन मागणी वाढली आहे. बाजारअभ्यासकांच्या मते या हळदीच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.