तुरीला ११,५०० रूपयांचा बाजारभाव
- By - Team Agricola
- May 01,2024
तुरीला ११,५०० रूपयांचा बाजारभाव
तुरीला सध्या बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे. सध्या तुरीला १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सर्वसाधारण भाव मिळतोय. तर जास्तीत जास्त भाव १२ हजार ५०० रुपयांपर्यंत मिळाला आहे.
सध्या तुरीला चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असुन बाजारसमितीत सर्वाधिक दर हा लाल तुरीला मिळत आहे. लाल, पांढऱ्या तुरीची बाजारात आवक वाढली आहे. लाल तुरीला सर्वाधिक दर हा ११ हजार ५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. ३० एप्रिल रोजी अमरावती बाजारसमितीत लाल तुरीला सरासरी ११ हजार ३०० रूपयांचा दर मिळाला आहे. माजलगाव, जालना बाजारसमितीत पांढऱ्या तुरीला सरासरी दर हा १० हजार ९०० रूपयांचा मिळत आहे.
तुरीला बाजारसमितीत समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.