new-img

पुणे बाजारसमितीत कांद्याला मिळतोय सरासरी २३०० रूपयांचा भाव

गेल्या काही दिवसांपासून बाजारसमितींमध्ये सध्या कांद्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. बाजारसमितीमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. सध्या बाजारसमितीत कांद्याचा सरासरी बाजारभाव हा २३०० ते २९०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार ११ जुलै रोजी पुणे बाजारसमितीत कांद्याला सरासरी बाजारभाव हा २३०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी बाजारभाव हा १५०० रूपये मिळाला असुन जास्तीतजास्त बाजारभाव हा ३१०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत आवक ही ९९२५ क्विंटल कांद्याची झाली आहे. पुणे- पिंपरी बाजारसमितीत याच दिवशी कांद्याला सरासरी दर हा २९०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा २८०० ते जास्तीतजास्त भाव हा ३००० रूपये मिळाला आहे. पुणे-मोशी बाजारसमितीत कांद्याला भाव हा सरासरी २२०० रूपये मिळाला आहे.