new-img

हिंगाेलीतील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील लिलाव सोमवारी बंद

हिंगाेलीतील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील लिलाव सोमवारी बंद

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोंढा १२ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे. या बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात हळदीची आवक ही होत असते. परंतु १ दिवस बाजारसमितीत बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारी हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी- विक्री व्यवहार हे बंद राहणार आहेत.
श्रावण महिन्याची या आठड्यापासून सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील दुसरा श्रावण सोमवार हा आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद राहणार आहे. जिल्ह्यात दुसऱ्या श्रावण सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम असल्याने व्यवहार हे बंद ठेवण्यात आले आहे. पवित्र श्रावण महिन्यानिमीत्त भाविकांकडून कावडयात्रेचे आयोजन केले जात असते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणुन १ दिवस बाजारसमिती बंद ठेवण्यात आलेली आहे. असे हिंगोली कृषी उत्पन्न बाजारसमितीचे श्री.नारायण बाबाराव पाटील सचिव यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.