new-img

कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न

कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न
महाराष्ट्रातून १६०० टन कांदा रेल्वेमार्गे दिल्लीला रवाना

कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार भरपूर प्रयत्न करत आहे. सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. प्रथमच बफर स्टॉकमधून १६०० टन कांदा महाराष्ट्रातून रेल्वेमार्गे दिल्लीपर्यंत नेणार आहे. कांद्यासाठी रेल्वेचा वापर करण्याचा हा पहिलाच उपक्रम असणार आहे.  'कांदा एक्स्प्रेस' ही विशेष ट्रेन महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरुन निघून 20 ऑक्टोबर रोजी  दिल्लीतील किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. रेल्वे वाहतुकीमुळं कांद्याचा खर्च कमी होणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली आहे.