बांगलादेशचा कांदा आयात शुल्काबाबतीत निर्णय
- By - Team Agricola
- Nov 08,2024
बांगलादेशचा कांदा आयात शुल्काबाबतीत निर्णय
बांगलादेशने कांदा आयात शुल्क हटवले.
बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले आहे. मात्र पुढील दोन महिन्यांकरीता हा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रकावरून दिसून येत आहे.
मागील अनेक महिन्यापासून बांगलादेशाने आयात शुल्क लावले होते. त्यामुळे भारतीय कांदा निर्यात होत नव्हता, शिवाय बाजारभाव देखील मिळत नव्हता. मात्र आता बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (NBR) कांद्याच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि नियामक शुल्क पूर्णपणे मागे घेतले आहे. स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे
याबाबत एनबीआरचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुर रहमान खान यांनी बुधवारी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिली. १५ जानेवारी २०२५ पर्यंत हे आयात शुल्क मागे घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.