new-img

कांद्याबाबत केंद्राचा दुसरा मोठा निर्णय...

कांद्याचे दर वाढण्याची चिन्हे असतानाच कांद्याची देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर केंद्राने तब्बल 40 टक्के शुल्क लागू केले. 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्यातशुल्क लागू असणार आहे. कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा काढला जावा यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (22 ऑगस्ट) केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच या खरेदीसाठी नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 2410 रुपये प्रति क्विंटल दराने हा कांदा खरेदी केला जाणार आहे.